डरबन (दक्षिण अफ्रिका) : दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या आशीष लता रामगोबिन (५६) यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा म्हणून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आशीष लता रामगोबिन या महात्मा गांधी यांची पणती आहेत. रामगोबिन यांना डरबनच्या न्यायालयाने ६२ लाख रुपये फसवणुकीच्या आरोपात ही शिक्षा सोमवारी सुनावली.पीडित व्यावसायिक एस. आर. महाराज यांनी सांगितले की, नफ्याचे आमिष दाखवून माझ्याकडून पैसे घेण्यात आले. माझी फसवणूक केली. महाराज यांनी लता यांना एक कन्साइमेंट इम्पोर्ट आणि कस्टम क्लीअर करण्यासाठी ६२ लाख रुपये दिले होते. परंतु, अशाप्रकारे कोणतेही कन्साइमेंट नव्हते. नफ्यातून काही वाटा एस. आर. महाराज यांना देऊ असे आमिष लता यांनी दिले होते. लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची मुलगी आहे.
फसवणुकीतूनउकळले पैसे- कोर्टाने सांगितले की, लता यांनी महाराज यांना आयात आणि सीमाशुल्क भरण्यासाठी पैसे कमी पडतायेत. बंदरावर सामान उतरवून घेण्यासाठी पैशांची आवश्यकता असून या कामासाठी ६२ लाख रुपयांची गरज आहे. खोटी कागदपत्रे दाखवली- महाराज यांना समजले की, लताने दाखवलेली सर्व कागदपत्रे बनावट आणि खोटी आहेत. त्याआधारे त्यांनी लता रामगोबिन यांच्याविरोधात खटला दाखल केला. - अशासकीय संस्था इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉन व्हायलेन्समध्ये कार्यकारी संचालक असलेल्या रामगोबिनने स्वत:ला पर्यावरण, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता असल्याचे सांगितले.