भूकंपाच्या (Earthquake) तीव्र झटक्याने चीन हादरला आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.3 एवढी नोंदवली गेली आहे. चीनमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता नुकत्याच तुर्कस्तानमध्ये आलेल्या भूकंपाच्यातुलनेत अधिक होती. तुर्कस्तानात आलेल्या भूकंपाची तीव्रता 6.9 एवढी होती. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपात तब्बल 40 हजार लोकांचा जीव गेला आहे.
एका स्थानीक वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये आलेल्या भूकंपाचीतीव्रता 7.3 रिकॉर्ड करण्यात आली. तजाकिस्तानच्या सीमेलगत चीनच्या शिंजियांगमध्ये भूकंप आला आहे. या भूकंपाचा परिणाम तजाकिस्तानपर्यंत दिसून आला आहे.का येतो भूकंप? -पृथ्वीमध्ये एकूण 7 प्लेट्स आहेत. या प्लेट्स सातत्याने फिरत असतात. मात्र काही ठिकाणे अशीही आहेत, जेथे या प्लेट्स एकमेकांना अधिक धडकतात. अशा प्रकारच्या झोनला फॉल्ट लाईन म्हटले जाते. सातत्याने टक्कर झाल्याने या प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि यानंतर, दबाव अधिक वाढतो. यामुळे प्लेट्स तुटू लागतात. यानंतर, खालील भागात असलेली ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागते आणि या डिस्टर्बन्समुळेच पृथ्वीवर भूकंप येतात. भूकंपाचे केंद्र पृथ्वीमध्ये जेवढे कमी खाली असते तेवढेच अधिक नुकसान होते.
भूकंपामुळे केव्हा आणि किती नुकसान होते? -- 0 से 1.9 तीव्रता - केवळ सिस्मोग्राफवर समजते.- 2 से 2.9 तीव्रता - लोकांना हलकी कंपने जाणवतात.- 3 से 3.9 तीव्रता - जवळून एखादा ट्रक गेल्यासारखे वाटते.- 4 से 4.9 तीव्रता - भिंतीवर लटकवलेल्या फ्रेम खाली पडण्याची शक्यता असते. खिडक्या तुटू शकतात. - 5 से 5.9 तीव्रता - फर्निचर हालू शकते.- 6 से 6.9 तीव्रता- इमारतीच्या भिंतींना तडे जाऊ शकतात. वरच्या मजल्यावर नुकसान होऊ शकते.- 7 से 7.9 तीव्रता - इमारती पडतात. जमिनीखालील पाईप फुटतात.- 8 से 8.9 तीव्रता - इमारतीसह मोठ-मोठे पुलही पडतात. याशिवाय त्सुनामीचा धोका असतो.- 9 आणि त्याहून अधिक तीव्रता - प्रचंड विध्वंस होतो, मैदानात उभा असलेल्या व्यक्तीला पृथ्वी डोलताना दिसते.