नवीन अभ्यास : म्यानमारच्या सीमेवरुन परोपजीवींचा प्रसार; आजाराच्या निर्मूलनात अडथळेलंडन : औषधांना न जुमानणारे मलेरियाचे परोपजीवी म्यानमार-भारत सीमेवर आढळल्यामुळे भारताला धोका निर्माण झाला आहे. या परोपजीवींमुळे मलेरियाविरोधी उपचार निरुपयोगी ठरून लक्षावधी लोकांचे जीवित संकटात आले असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.भारतात औषधांना प्रतिकार करणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवींची वाढ ही मलेरियाचे जगातून नियंत्रण व निर्मूलन करण्याच्या कामात गंभीर स्वरूपाचा अडथळा निर्माण करणारी असल्याचे संशोधकांनी म्हटले. औषधांना न जुमानणारे परोपजीवी आशियातून आफ्रिका उपखंडात पसरले किंवा आफ्रिकेत नव्याने निर्माण झाले (असे यापूर्वी अनेक वेळा घडले आहे) तर लक्षावधी लोकांचे जीवित धोक्यात येऊ शकते,असे हे शास्त्रज्ञ म्हणत आहेत.म्यानमारमध्ये मलेरियावरील उपचारांच्या ५५ केंद्रांवरील परोपजीवींचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. काही विशिष्ट भागातील केल्च जीनचे (के-१३) नमुने घेऊन तेथील जीवनपद्धतीत काही बदल झाला आहे का याचा तपास संशोधक करणार आहेत. केल्च जीन हे औषधांना प्रतिकार करणारे म्हणून ओळखले जातात. भारतीय सीमेपासून २५ किलोमीटरवरील होमालीन, सगार्इंग भागात औषधाला प्रतिकार करणारे परोपजीवी असल्याला संशोधकांच्या तुकडीने दुजोरा दिला आहे. वुर्मवूड या झुडुपापासून निघणाऱ्या मलेरियाविरोधी औषधासाठी म्यानमार आघाडीवर असल्याचे समजले जाते व जगात मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठीही म्यानमारची महत्त्वाची भूमिका समजली जाते, असे थायलंडमधील माहिडोल-आॅक्सफर्ड ट्रॉपिकल मेडिसीन रिसर्च केंद्राचे व आॅक्स्फर्ड युनिव्हर्सिटीतील या विषयावरील वरिष्ठ अभ्यासक डॉ. चार्लस् वुड्रो यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)संशोधकांनी ९४० डीएएनएचा केला अभ्याससीमेवरील भागात सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे हे चांगले समजले म्हणजे नेमके काय उपाय राबवायचे यासाठी आपल्याला तयार राहता येईल,असे डॉ. वुड्रो म्हणाले. संशोधकांच्या तुकडीने म्यानमारमधून तसेच म्यानमारच्या सीमेवरील थायलंड व बांगलादेशातून २०१३ व २०१४ मध्ये मलेरियाची बाधा झालेल्या ९४० नमुन्यांच्या डीएनएचे सिक्वेन्सेस गोळा केले आहेत.दक्षिण-पूर्व आशियातच मलेरियाचा धोका का निर्माण झाला तर तेथे मलेरियाला नैसर्गिकरीत्या तोंड देण्याची पातळी खूप खाली आहे. सीमेवरील भागात मलेरियाला तोंड देण्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. वुड्रो म्हणाले. आज तरी मलेरियाचा फैलाव भारतात होण्याची मोठी भीती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.