क्वालालंपूरः काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा मुद्दा आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात कायम भूमिका घेतली होती. त्यानंतर भारतानंही मलेशियाकडून पाम ऑइल खरेदी करण्यावर बंदी घातली होती. आता मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टीव्ही चॅनेल अल जजिराच्या माहितीनुसार, महातीर यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा तिथल्या राजांकडे सुपूर्द केला आहे. महातीर मोहम्मद 10 मे 2018ला पंतप्रधान झाले होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, महातीर यांचा पक्ष बेरास्तूनं सरकारशी असलेली आघाडी तोडली आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 94 वर्षांचे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते असलेल्या महातीर यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. महातीर यांनी मलेशियाचे पंतप्रधान म्हणून राजीनामा दिला आहे. का दिला राजीनामा?गेल्या काही आठवड्यांपासून मलेशियाच्या राजकारणात अस्थिरता आली होती. खरं तर 2018मध्ये महातीर आणि अन्वर इब्राहिमनं मिळून सरकार स्थापन केलं होतं. 94 वर्षांचे महातीर कालांतरानं सत्ता अन्वर यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचीही मल्लिनाथी करण्यात आली होती. परंतु अन्वर यांनी महातीर यांच्या पक्षावर फसवणुकीचा आरोप लावला आहे. महातीर यांनी आम्हाला धोका देत युनायटेड मलायस नॅशनल ऑर्गनायझेशन (UMNO)बरोबर हातमिळवणी केली आहे. राजकारणातले चाणाक्ष्य खेळाडू आहेत महातीरमहातीर यांची मलेशियाच्या राजकारणावर मजबूत पकड होती. वर्षं 1981 पासून 2003पर्यंत पंतप्रधान राहिले होते. त्यानंतर 2018मध्ये पुन्हा एकदा त्यांनी सत्ता सांभाळली होती. 2018मध्ये त्यांनी नझीब रझाक यांचा पराभव केला होता. रझाक यांच्यावर त्यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप होते. इम्रान खान यांचे मित्रपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि महातीर यांच्यामध्ये मैत्री वृद्धिंगत झाली होती. त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या बाजूनं मतप्रदर्शन केलं होतं. त्यानंतर भारत आणि मलेशियाच्या मैत्री अंतर पडलं होतं. त्याचबरोबर भारतानं मलेशियाकडून पाम ऑइल आयातीवर बंदी घातली होती.
मोदी सरकारशी अकारण 'पंगा' घेणारे मलेशियाचे PM महातीर मोहम्मद यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 4:18 PM
मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ठळक मुद्देमलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.महातीर यांचा पक्ष बेरास्तूनं सरकारशी असलेली आघाडी तोडली आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 94 वर्षांचे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते असलेल्या महातीर यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.