ऑनलाइन टीम
युक्रेन, दि. १७ - मलेशियन एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाला रशियाच्या आणि युक्रेनच्या सीमेजवळ युक्रेनच्या बंडखोरांनी क्षेपणास्त्राचा मारा करून पाडले. यामध्ये २९५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमान एस्टमर्डमहून क्वालांलपूरला निघाले होते.
या विमानात क्रू मेंबरसहित २९५ यात्री प्रवास करीत होते. रशिया आणि युक्रेनच्या सीमेजवळ हे विमान आले असताना क्षेपणास्त्राचा वापर करून हे विमान पाडल्याची माहिती युक्रेनचे गृहमंत्र्यांचे सल्लागार यांनी दिली आहे. तर या घटनेचा तातडीने तपास करण्याचे आदेश युक्रेनच्या पंतप्रधानांनी संबंधितांना दिले आहेत. मलेशियन कंपनीचे एमएच १५ या क्रमांकाच्या या विमानामध्ये २८० प्रवासी तर १५ क्रू मेंबर प्रवास करीत होते. मलेशियन एअरलाईन्सकडून सांगण्यात आले आहे की, या विमानाला ३० हजार फुटावरून क्षेपणास्त्राचा मारा करून हे विमान पाडण्यात आले आहे. अल अरबीया चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार सर्वच्या सर्व प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी संपर्क साधला आहे.