क्वालालंपूर -फ्रान्समधील नीस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण जगात निंदा होत असताना आणि संपूर्ण जग फ्रान्सच्या दुःखात सहभागी झाले असतानाच, मलयेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी अत्यंत प्रक्षोभक विधान केले आहे. मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हणत पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे.
महातिर यांनी गुरुवारी झालेल्या नीस हल्ल्यानंतर एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी फ्रान्सविरोधात अत्यंत प्रक्षोभक शाष्य केले आहे. 'इतरांचा सन्मान करा' या नावाने लिहिण्यात आलेल्या या ब्लॉगमध्ये महातिर यांनी नीस हल्ल्याचा थेट उल्लेख केलेला नाही. महातिर यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक, असे एकूण 14 ट्विट केले आहेत. यात त्यांनी मुसलमानांसोबत भेदभाव होत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर फ्रान्सने पूर्वी मुसलमानांवर जे अत्याचार केले, त्यासाठी मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांची कत्तल करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे मोहम्मद यांनी म्हटले आहे.
फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला; महिलेचा गळा चिरला, तिघांचा मृत्यू महम्मद यांनी, चेचन्याई विद्यार्थ्याने फ्रेंच शिक्षक सॅमुअल पेटच्या हत्येचा उल्लेख करत लहिले, "मुस्लिमांना रागावण्याचा अधिकार आहे. पूर्वी केल्या गेलेल्या नरसंहारासाठी फ्रन्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, अद्याप मुस्लीम 'डोळ्याच्या बदल्यात डोळ्या'कडे वळलेले नाहीत. फ्रान्सने आपल्या नागरिकांना दुसऱ्याच्या भावनांचा विचार करण्याची शिकवण द्यायला हवी"
Nice Attack: हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार
फ्रान्समधील नीस शहरात असलेल्या नॉट्रडम चर्चमध्ये एका हल्लेखोराने एका महिलेचा चाकूने गळा कापून हत्या केली. यात इतर दोघांचाही मृत्यू झाला आहे. हा 20 वर्षांचा हल्लेखोर इटलीमार्गे फ्रान्समध्ये आला होता, असे अतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हातात कुरान आणि चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला होता. शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.