माले (मालदीव) - गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनेक राजकीय उलथापालथींनंतर आज अखेर मालदीवमध्ये सत्तांतर झाले आहे. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत वर्तमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना पराभवाचा धक्का देत अपक्ष उमेदवार इब्राहीम मोहम्मद सोलिह यांनी विजयाची नोंद केली आहे. सोलिह हे भारतासोबत दृढ संबंधांचे समर्थक असल्याने मालदीवमधील या निवडणुकीत सोलिह यांना मिळालेला विजय भारतासाठी सुचिन्ह मानला जात आहे.
मालदीवमध्ये सत्तांतर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते सोलिह यांचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 3:13 AM