सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे धाडस पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओतील एक माणूस खांद्यावर तब्बल 113 किलो वजनाचा 22 फूट लांब साप घेऊन जाताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये 22 फूट लांब साप खांद्यावर घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे नाव जय ब्रेवर आहे. तो प्राणी संग्रहालयात काम करतो. तो अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मगरी किंवा सापांसोबतचे व्हिडिओ आणि फोटोज पोस्ट करत असतो. या व्हिडिओमध्ये जय ब्रेवर प्राणी संग्रहालयातील सापाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत होता. जय ब्रेव्हरने स्वतः हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला.
व्हिडिओवर विविध कमेंट्सइन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करताना जय ब्रेवरने कॅप्शनमध्ये लिहिले, 'जेव्हा 22 फूट लांब आणि 113 किलो वजनाच्या सापाला मदत करण्यासाठी कोणी नसेल, तेव्हा तुम्ही ते जुन्या पद्धतीने करा.' या व्हिडिओवर नेटीझन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे.