प्रायव्हेट पार्टमध्ये सिलिकॉन इंजेक्शन घेतल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झला. इंजेक्शन घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे साइड इफेक्ट्स दिसले. ज्याचे त्याने फोटोही शेअर केले होते. इंजेक्शनमुळे त्याची स्थिती इतकी वाईट झाली होती की, नंतर त्याचा मृत्यू झाला. 28 वर्षीय या तरूणाचं नाव होतं जॅक चॅपमॅन. जॅक हा ऑस्ट्रेलियाचा राहणारा होता.
डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचं कारण सिलिकॉन इंजेक्शन सिंड्रोम असं सांगितलं. सोबतच त्याला फुप्फुसाचीही समस्या होती. प्रायव्हेट पार्टमध्ये सिलिकॉन इंजेक्शन घेतल्यानंतर जॅकने सूज आल्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याने लिहिलं होतं की, हे इंजेक्शनचे साइड इफेक्टस आहेत.
मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार, जॅक समलैंगिक समुदायात Master Slave Relationship मध्ये सहभागी होता. जॅकच्या आईने आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी एक फेमस समलैंगिक ब्लॉगर डायलनला दोषी ठरवलं. आरोप आहे की, शरीरात बदल करण्यासाठी सिलिकॉन इंजेक्शन घेण्यासाठी तो जॅकला प्रेरित करत होता. ही घटना 2019 मधील आहे. पण काही दिवसांपूर्वी याप्रकरणी जॅकच्या आईने जबाब दिला. ज्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं.
जॅकच्या आईने आरोप केला की, बॉडी मॅनिपुलेशनसाठी जॅकने इंजेक्शन घेतलं होतं आणि याच्या साइड इफेक्टमुळे काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्याला यासाठी प्रेरित करण्यात आलं होतं. बॉडी मॅनिपुलेशन एक प्रकारची चिकित्सा आहे ज्यात डॉक्टर रूग्णाच्या शरीराच्या एक किंवा त्यापेक्षा जास्त भागात बदल करतात.