एका व्यक्तीला लघवीतून रक्त येण्याची समस्या होती. जेव्हा तो डॉक्टरांकडे चेकअप करण्यासाठी गेला तेव्हा सत्य जाणून हैराण झाला. त्याच्या शरीरात ओवरी आणि गर्भाशय आढळून आले. इतकंच नाही तर त्याला 20 वर्षांपासून मासिक पाळीही येत होती. डॉक्टरांनी सांगितलं की, तो बायोलॉजिकली एक महिला आहे.
ही घटना चीनच्या (China) Sichuan प्रांतातील आहे. टेस्ट करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, चेन यू याला (बदललेलं नाव) मेल जेनिटल ऑर्गन असूही तो फीमेल सेक्स क्रोमोसोम्ससोबत ओवरी आणि एका गर्भाशयासोबत जन्माला आला होता.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, 33 वर्षीय चेन यू याच्या लघवीतून रक्त येत होतं. हे दाखवण्यासाठी तो डॉक्टरांकडे गेला होता. चेकअप केल्यावर समजलं की, प्रत्यक्षात त्याला मासिक पाळी होत होती. ज्यामुळे त्याच्या लघवीतून रक्त येत होतं. हे सगळं गेल्या 20 वर्षांपासून सुरू होतं. हे समजल्यावरही डॉक्टरही हैराण झाले.
डॉक्टरांना आधी वाटलं की, चेन च्या पोटात वेदना Appendicitis मुळे होत आहे. पण उपचार करूनही वेदना कमी न झाल्याने डॉक्टरांनी पुन्हा त्याचं चेकअप केलं. तेव्हा हे सत्य समोर आलं.
रिपोर्टनुसार, चेन यू 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून लघवीतून ब्लडच्या समस्येने पीडित होता आणि दर महिन्यात त्याच्या पोटातही दुखत होतं. गेल्या महिन्यात डॉक्टरांनी 3 तासांची सर्जरी करून त्याच्या शरीरातून ओवरी आणि गर्भाशय काढला. डॉ़क्टरांनी सांगितलं की, चेन आता पूर्णपणे ठीक आहे आणि सध्या आराम करत आहे. तो लवकरच एका पुरूषासारखं सामान्य जीवन जगू शकेल. पण चेन हा बाळांना देऊ शकणार नाही कारण त्याचे टेस्टिकल्स स्पर्म प्रोड्यूस करत नाही.