गंमत किती महागात पडू शकते याचा अंदाज रशियातील या घटनेवरून लावला जाऊ शकतो. इथे गंमत म्हणून घाबरवण्याच्या नादात एक व्यक्ती ५० फूट खाली पडला आहे. व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर डॉक्टर म्हणाले की, रूग्ण कोमात गेला आहे. पोलीस यासंबंधी दुसऱ्या व्यक्तीची चौकशी करत आहे. त्याने स्वत:ला निर्दोष असल्याचं सांगितलं.
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ही घटना रशियातील Kogalym मध्ये घडली. इथे दोन व्यक्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पार्टी कत होते. पार्टी दरम्यान २६ वर्षीय व्यक्ती खिडकीत ताजी हवा घेण्यासाठी उभा झाला. तेव्हाच ५६ वर्षीय दुसऱ्या व्यक्तीने गंमत म्हणून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. हीच गंमत महागात पडली आणि खिडकीत उभी असलेली व्यक्ती थेट ५० फूट खाली जाऊन पडली. (हे पण वाचा : गुगलवर शोधलं 'सर्वात खतरनाक ठिकाण', तिथे फिरायला गेला आणि मग घडलं असं काही....)
वयोवृद्ध व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मागून धक्का देण्याचं नाटक केलं. पण बाल्कनीच्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीचा बॅलन्स बिघडला. त्याने बाल्कनीची रेलिंग पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते जमलं नाही. आधी तो खालच्या मजल्यावर असलेल्या एसीच्या मशीनला भिडला आणि नंतर थेट खाली जाऊन पडला. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, गंभीर जखमा झाल्याने व्यक्ती कोमात गेली आहे. सध्याच काही सांगण अवघड आहे.
तेच ५६ वर्षीय दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की, तो निर्दोष आहे. त्याने मुद्दामहून त्याला धक्का दिला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाली आहे. पोलीस फुटेजच्या मदतीने याचा शोध घेत आहे की, ही घटना खरंच अपघात आहे की, कोमात गेलेल्या व्यक्तीविरोधात षडयंत्र आहे. पोलिसांनुसार दोघेही दारू पिऊन होते.