अरुकारिया (ब्राझिल) : घटस्फोट साजरा करण्यासाठी उंचावरून उडी मारण्याचा ‘बंगी जंपिंग’ सारखा खेळ खेळणे एका तरुणाला महागात पडले. उडी घेताच शरीराला बांधलेला दोरखंड तुटल्याने तो ७० फूट खाली कोसळला. यात त्याच्या मानेसह कंबरेचा मणका मोडला. नशीब बलवत्तर म्हणजे तो खाली असलेल्या तलावाच्या पाण्यात पडला. अन्यथा अनर्थ झाला असता. राफेल डॉस सँटोस टोस्टा (वय २२) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. ब्राझीलच्या कॅम्पो मॅग्रो येथील लागोआ अझुल (ब्लू लॅगून) या पर्यटनस्थळी २२ फेब्रुवारी रोजी ही दुर्घटना घडली. राफेल सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
मुसळधार पावसात लागले लग्न, संकट आले तरी त्यांचे प्रेम डगमगले नाही.. व्हायरल व्हिडिओ
राफेल बंजी जंंपिंगसारख्या ब्रिज स्विंग हा साहसी खेळ खेळून घटस्फोट साजरा करू इच्छित होता. लागोआ अझुल येथे २० मीटर उंचीवरून त्याने उडी घेतली. पण, शरीराला बांधलेला दोरखंड तुटल्यामुळे तो ७० फूट खाली कोसळला. राफेल २२ वर्षांचा होण्याच्या तीन दिवस आधी ही दुर्घटना घडली. जवळजवळ तीन महिन्यांनंतर अनेक फिजिओथेरपी व उपचार सत्रांनंतरही तो अजूनही अनेक शारीरिक वेदनांना सामोरे जातोय.