China : महिलांना इम्प्रेस करण्यासाठी एक व्यक्ती खोटा आर्मी ऑफिसर बनून फिरत होता. तेही एक-दोन दिवस नाही तर तब्बल चार वर्ष. तो महिलांना कर्नल असल्याचं सांगत होता. पण जास्त काळ तो हे लपवून ठेवू शकला नाही. त्याचा भांडाफोड झाला आणि त्याला तुरूंगात जावं लागलं.
ही घटना चीनच्या जियांग्सी प्रांतातील आहे. झू आडनाव असलेल्या या व्यक्तीने स्वत:ला चार वर्षांपर्यंत आर्मी ऑफिसर म्हणून सादर केलं. यामागचं कारण फक्त त्याला महिलांना इम्प्रेस करायचं होतं. तो चार वर्ष कर्नल बनून फिरत होता. हे करून त्याने अनेक महिलांना इम्प्रेसही केलं होतं.
पण नुकताच तो कोविड-19 चेकअपसाठी मेडिकल कॅम्पमध्ये सेनेच्या ड्रेसमध्ये गेला होता. यावेळी त्याने स्वत:ला हाय रॅंक ऑफिसर असल्याचं सांगितलं. तसेच काही डॉक्युमेंट्सही स्टाफला दाखवले. जेव्हा स्टाफने रेकॉर्ड चेक केला तर त्यात या व्यक्तीचं नावच दिसलं नाही. अशात त्याचा भांडाफोड झाला.
त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. चौकशीतून समोर आलं की, झू कोणता आर्मी ऑफिसर नाही. तर तो एक फ्रॉड आहे.
चीनच्या एका न्यूज चॅनलनुसार, आरोपी व्यक्तीने सांगितलं की, त्याला एक आर्मी ऑफिसर बनायचं होतं. कारण महिला सेनेच्या जवानांकडे आकर्षित होतात. यासाठी त्याने 2018 मध्ये सेनेचा यूनिफॉर्म खरेदी केला. हे कपडे घालून तो लोकांना खोटं सांगत होता. लोकांना फसवण्यासाठी त्याने एका फेक आयडी सुद्धा तयार केलं होतं.