कोरोनोत्तर काळात चीनमधून अनेक विशेषत: मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आपला गाशा गुंडाळतील अशी शक्यता आता जगभर बोलून दाखवली जाते आहे. जपान सरकारने तर घसघशीत रकमेची तरतूद करत आपल्या कंपन्यांना आर्थिक हात दिला आणि सांगितलं चीनमधून बाहेर पडा, जपानमध्ये परत या नाही तर अन्य आशिया-पॅसिफिक देशांत गुंतवणूक करता येतेय का पहा.आता अमेरिकन कंपन्यांही आपले मॅन्युफॅक्चरिंगचे काम चीनमधून हलवतील आणि तशाच तुलनेनं स्वस्त मनुष्यबळ व कच्चा मालासह अन्य सेवांसाठी भारतात येतील, अशी शक्यता आहे. तीच एक शक्यता यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक आणि पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश अगी यांनी व्यक्त केली आहे. साधारण २०० कंपन्या भारतात आपले तळ उभारण्याच्या तयारीत आहे, असं ते सांगतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची निवडणूक पार पडल्यावर ते होऊ शकेल असा त्यांचा अंदाज आहे. अर्थात ही संधी आहे आणि त्यासाठी भारत सरकारने पुढाकार घ्यायला हवा, असंही ते सांगतात. ते म्हणतात, भारतात अधिक पारदर्शक कारभार, नवी दिल्लीने आर्थिक सुधारणांना वेग दिला, बदल स्वीकारला तर या कंपन्या भारतात येतील आणि त्याचा भारताला फायदा होऊ शकेल.अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत लॉबिंग ही नवी गोष्ट नाही, ती तिथं कायदेशीरही आहे. त्यामुळे आताच भारताच्या बाजूनं लॉबिंग सुरूझालेलंही असू शकतं, आता ही संधी खरंच भारत साधेल का, त्या कंपन्या भारतात येतील का, हे पहायचं.
CoronaVirus: चीनची 'ती' ओळख पुसली जाणार?; लवकरच भारताला बंपर फायदा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 5:01 AM