पॅरिस : कोरोनावरील रामबाण उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याचा उदोउदो केला ते मलेरियावरील ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ व ‘लॉपीनॅविर-रिटोनॅविर’ ही एचआयव्हीवरील औषधे दिल्याने फ्रान्समध्ये किमान चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे, तर इतर किमान १०० रुग्णांच्या प्रकृतीत प्राणघातक गुंतागूंत निर्माण झाली आहे.
फ्रान्स सरकारच्या ‘एएनएसएम’ या औषधी सुरक्षा व नियंत्रण संस्थेने ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली आहे. ज्यांचा गुणकारी उपयोग अद्याप खात्रीलायकपणे सिद्ध झालेला नाही, अशी अन्य आजारांवरील औषधे कोरोनासाठी वापरल्याने फायद्याऐवजी धोका कसा संभवू शकतो, हेच यावरून दिसते. ‘एएनएसएम’ने एका निवेदनात म्हटले की, प्रायोगिक औषधांमुळे २७ मार्चपासून आतापर्यंत फ्रान्समध्ये किमान चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आणखी तिघांना मरता मरता वाचविण्यात आले आहे. याखेरीज इतरही सुमारे १०० कोरोना रुग्णांना या प्रायोगिक औषधांची गंभीर ‘रिअॅक्शन’ येऊन त्यांची प्रकृती आधी होती त्याहून अधिक खालावल्याचे निष्पन्न झाले आहे.अमेरिका, ब्राझीलसह १३ देशांना निर्यातच्निर्यातबंदी शिथिल केल्यानंतर भारत सरकारने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ हे औषध व त्यासाठी लागणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीसाठी ज्या १३ देशांची पहिली यादी मंजूर केली आहे, त्यात अमेरिका व ब्राझील या देशांचा प्रामुख्याने समावेश आहे.च्निर्यात केल्या जाणाºया ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या गोळ्यांपैकी ३५ टक्के व त्यासाठी लागणाºया औषधी द्रव्यांपैकी ६५ टक्के वाटा अमेरिकेस निर्यात केला जाणार आहे. ज्या इतर देशांना भारत या औषधाची निर्यात करणार आहे त्यांत बहारीन, मॉरिशस, सेशेल्स, डॉमिनिकन प्रजासत्ताक, जर्मनी, स्पेन यांच्यासह नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.