रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियामधील खासगी सैन्य 'वॅगनर'ने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारले होते. मात्र, पुतिन यांच्या कठोर भूमिकेनंतर 'वॅगनर'ने आपला विरोध मागे घेतला. परंतु यानंतरही 'वॅगनर' ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
रशियाचे सैन्य मुख्यालय ताब्यात घेतले आहे, असा दावा येवगेनी प्रिगोझिन यांनी केला होता. यानंतर पुतिन यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर लगेच येवगेनी प्रिगोझिनविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले.
दरम्यान, रशियाच्या वॅगनर सैन्याप्रमाणे अनेक देशांचे स्वतःचे खाजगी सैन्य आहे. हे देश युद्ध लढण्यासाठी आपले सैन्य भाड्याने दुसऱ्या देशात पाठवतात. तर जाणून घ्या कोणत्या देशाचे स्वतःचे खाजगी सैन्य आहे?
ऑस्ट्रेलियामधील युनिटी रिसोर्स ग्रुपऑस्ट्रेलियामध्ये युनिटी रिसोर्स ग्रुप नावाचे एक खाजगी सैन्य आहे, ज्यामध्ये जगभरातील 1200 हून अधिक सैनिक आहेत. या ग्रुपची संपूर्ण जबाबदारी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ग्रेट ब्रिटनच्या निवृत्त अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. हा ग्रुप ऑस्ट्रेलियासह आफ्रिका, अमेरिका, युरोप आणि मध्य आशियामध्येही काम करतो. बगदादमधील ऑस्ट्रेलियन दूतावासाच्या सुरक्षेसाठी युनिटी रिसोर्स ग्रुप जबाबदार आहे. लेबनॉनमध्ये शांततापूर्ण आणि सुरळीत निवडणुका पार पाडण्यासाठी हे सैन्य तैनात करण्यात आले होते. तसेच, बहारीनमध्ये याच ग्रुपचे सैन्य तैनात करून खाजगी तेल कंपनीला मदत केली होती.
अफगाणिस्तान आणि बहरीनमध्ये ब्रिटनचे खाजगी सैन्यएजिस डिफेन्स सर्व्हिसेस ही एक ब्रिटिश खाजगी सैन्य आणि खाजगी सुरक्षा कंपनी आहे. या कंपनीची अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, इराक, सौदी अरेबिया, लिबिया, सोमालिया आणि मोझांबिक येथे कार्यालये आहेत. ही सेना 2002 मध्ये सुरू झाली. याचे मुख्यालय लंडन, युनायटेड किंगडम येथे आहे. सध्या या सैन्यात सुमारे 5000 सैनिक आहेत, जे अफगाणिस्तान आणि बहरीनमध्ये पसरलेले आहेत.
ब्रिटनच्या खासगी सैन्यात 16 हजार सैनिकांचा समावेशब्रिटिशांचे खाजगी सैन्य अरिनी इंटरनॅशनल आहे, ज्याचे मुख्यालय दुबई येथे आहे. या सैन्यात 16 हजार सैनिक आहेत. हे सैन्य जगभरात 282 ठिकाणी तैनात करण्यात आले आहे, परंतु त्यांची सर्वात मोठी तुकडी आफ्रिकेत तैनात आहे. या सैन्याचा उपयोग काँगो प्रजासत्ताकमधील लोह, तेल आणि वायू प्रकल्पांना सुरक्षा देण्यासाठी केला जातो.
अमेरिकेतील डायनकॉर्पअमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये खाजगी सैन्य डायनेकॉर्पची स्थापना 1946 मध्ये झाली. डायनकॉर्पचे मुख्यालय फक्त व्हर्जिनिया येथे आहे. डायनकॉर्पमध्ये 10,000 सैनिक आहेत, जे आफ्रिका, पूर्व युरोप आणि लॅटिन अमेरिकेत सक्रिय आहे. या खाजगी सैन्याने सोमालिया आणि सुदानमध्ये पेरूच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसह अनेक मोठ्या मोहिमा राबवल्या आहेत. दरम्यान, कोलंबियाच्या बंडखोरांशी लढताना हे सैन्य प्रसिद्धीच्या झोतात आले. अमेरिकेकडे इतर चार खाजगी सैन्याचे ग्रुप आहेत, ज्यात 83 हजार सैनिक आहेत.
अफगाणिस्तानमधील एशिया सिक्युरिटी ग्रुपअफगाणिस्तानचे स्वतःचे खाजगी सैन्य देखील आहे, ज्याचे नाव एशिया सिक्युरिटी ग्रुप आहे. याचे मुख्यालय काबूल येथे आहे. या सैन्यात 600 जवानांचा समावेश करण्यात आला आहे. आपले मिशन यशस्वी करण्यासाठी अमेरिकेने अनेकवेळा या सैन्याला सोबत घेतले आहे. अमेरिकन लष्कराने एशिया सिक्युरिटी ग्रुपसोबत कोट्यवधी डॉलर्सचा करार केला आहे. या ग्रुपमधील भाडोत्री सैनिकांची भरती डायनकॉर्प, अमेरिकेच्या खाजगी सैन्याने केली आहे.