शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

अनेक मोठे तलाव कोरडे होण्याच्या मार्गावर; जगातील पाणी होतेय कमी, २ अब्ज लोकांवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 9:19 AM

'सायन्स' या नियतकालिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध झाला आहे. भारतीय वंशाचे बालाजी राजगोपालन हे या लेखाचे सह-लेखक आहेत.

वॉशिंग्टन : जगातील पाण्याचे साठे नष्ट होत असून, निम्म्याहून अधिक मोठे जलाशय कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जगातील सुमारे २५ टक्के लोकसंख्येवर भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केले असून, त्यातून हा इशारा देण्यात आला आहे.

'सायन्स' या नियतकालिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध झाला आहे. भारतीय वंशाचे बालाजी राजगोपालन हे या लेखाचे सह-लेखक आहेत. त्यांच्या मते शास्त्रज्ञांचे लक्ष नद्यांच्या दुरवस्थेकडे आहे. मात्र, तलावांकडे कोणाचे लक्ष नाही. कॅस्पियन सागर आणि अरल सागर यांसारख्या मोठ्या तलावांमधील नैसर्गिक आपत्ती हे एक मोठे संकट आहे, असे संशोधक म्हणतात. (वृत्तसंस्था)

दरवर्षी २२ गिगा टन पाणी घटलेसंशोधकांनी १९९२ ते २०२० या कालावधीत पृथ्वीवरील १,९७२ मोठे तलाव आणि जलाशयांचा उपग्रहांतून काढलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला. या ३० वर्षांमध्ये पाणी- पातळीमध्ये किती फरक दिसला, हे तपासण्यात आले. त्यातून त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. ५३ टक्के तलावांमध्ये दरवर्षी २२ गिगा टन एवढे पाणी कमी झाल्याचे आढळले आहे.

१९७२ तलाव आणि जलाशयांचा अभ्यास करण्यात आला. भरपूर पाऊस असलेल्या ठिकाणीही जलसाठा घटला. मोठे तलाव आणि जलाशयांमध्ये सुमारे ६०३ क्युबिक किलोमीटर एवढे पाणी घटले आहे. जगातील कोरड्या भागांशिवाय दमदार पावसाच्या भागातील तलावांमध्येही जलस्तर कमी झाला आहे. यामुळे संशोधकांनाही धक्का बसला आहे. हवामान बदलामुळे तापमान वाढले आहे. परिणामी बाष्पीभवन वाढले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

लोकसंख्येवर भीषण पाणीटंचाईचे संकटपाणी कमी होण्यामागे प्रत्येकजण हवामान बदलाचे कारण देत आहे. याशिवाय आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पाण्याचा वाढता वापर. जगाची लोकसंख्या गेल्या तीन दशकांमध्ये प्रचंड वाढली आहे. साहजिकच पाण्याचा वापरही त्या तुलनेत वाढला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई