बीजिंग: जगभरात यावर्षी येणाऱ्या सर्वाधिक शक्तिशाली वादळांपैकी एक मानले जाणारे ‘मेरांती’ वादळ गुरुवारी पहाटे चीनच्या फुजियान प्रांतात धडकल्याने या क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले आहे. शियामेन शहरातील शियानगानमध्ये आलेले हे वादळ दक्षिण फुजियान प्रांतात १९४९ नंतर आलले सर्वात शक्तिशाली वादळ आहे. यामुळे परिसरातील पाणी आणि वीज पुरवठा पूर्णत: ठप्प पडला असून वेगवान हवा आणि पावसाने थैमान घातले आहे,अशी माहिती शिन्हुआ या शासकीय वृत्तसंस्थेने दिली आहे.चक्रीवादळाचा तडाखा : तैवानला २१ वर्षानंतरच्या सर्वात शक्तिशाली मेरांंती चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. काओसुर्इंग भागातील शिझिवान येथे मासेमारीवर निघालेली बोट अशी उलटली. दुसऱ्या छायाचित्रात चीनच्या पूर्व फुजान प्रांतातील झियामेन येथे उद्ध्वस्त झालेली इमारत. या भागाला गुरुवारी २३० किमी. वेग असलेल्या वादळाने धडक दिल्यानंतर अनेक घरे जमीनदोस्त झाली.
चीनच्या किनारपट्टीवर धडकले ‘मेरांती’
By admin | Published: September 16, 2016 1:31 AM