शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मलेशियाच्या उत्सव वर्षाला मराठी मातीचा गंध

By admin | Published: March 09, 2015 11:31 PM

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या मलेशियातील इअर आॅफ फेस्टिवलमध्ये वर्षभर होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमांत मूळ दक्षिण भारतीय वंशाच्या

धर्मराज हल्लाळे, क्वालालंपूरजगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या मलेशियातील इअर आॅफ फेस्टिवलमध्ये वर्षभर होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमांत मूळ दक्षिण भारतीय वंशाच्या नागरिकांचा सहभाग लक्षणीय आहे़ त्याचवेळी मलेशियातील लिटल इंडिया अशी ओळख असलेल्या ब्रीक फिल्डस् भागातील ३५० मराठी कुटुंबही आपला बाणा जपत सण-उत्सव साजरे करीत असून गुढीपाडवाही थाटात होईल़ चिनी नववर्ष प्रारंभाचा खुला उत्सव तेलुक इन्तान (पेरा) येथे २८ फेब्रुवारीपासून सुरू झाला़ त्याचवेळी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली मलेशियास्थित मराठी माणसेही आपली भाषा, वेशभूषा, संस्कृती, परंपरा जपत महाराष्ट्रीयन मंडळाच्या माध्यमातून उत्सवांचे २०१५ वर्ष आपापल्या रंगढंगात साजरा करीत आहेत़ मलेशियातील महाराष्ट्रीयन मंडळाचे अध्यक्ष तथा मूळचे नागपूर येथील पंकज हेडाऊ लोकमतशी बोलताना म्हणाले, मलेशियामध्ये भारतीयांचा सन्मानपूर्वक उल्लेख होतो़ अगदी मलेशियाच्या स्वातंत्र्यापासून इथे राहणारी मंडळी आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत़ डॉ़वसंत नाडकर्णी, अजित केळकर, सतीश दळवी, नारायण नायर, अभिजित मुळे यांनी सुरुवातीच्या काळात मंडळाचे काम उभे केले़ त्यानंतर नंदकिशोर सावंत, विवेक परांजपे, संजय दीक्षित, संजय लांडगे, शिवाजी धुरी, मंदा हसमनीस, जिवेंद्र पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी गणेशोत्सव, कोजागिरीसह मराठी सण उत्सव एकत्रितपणे साजरे करण्याची परंपरा सुरू केली़ सण उत्सवाबरोबर मनोरंजन व प्रबोधनाच्या कार्यक्रमांचीही रेलचेल सुरू असते़ दिलीप प्रभावळकर, संदीप पाठक यांनी संवाद साधला़ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्याशीही मराठी कुटुंबांनी बातचीत केली़ दरम्यान, मलेशियातील उत्सव वर्षाचा भाग म्हणून चिनी नववर्ष प्रारंभाचा दिमाखदार सोहळा तेलुक इन्तान येथे नुकताच झाला़ यावेळी भारतासह फिलिपाईन्स, जपान, सिंगापूर, सौदी अरेबिया, इराण, आॅस्ट्रेलिया, रशिया अशा आठ देशांतून आलेल्या ५० पत्रकारांसह हजारो पर्यटकांनी उत्सव वर्षाच्या सोहळ्याला हजेरी लावली़ यावेळी मलेशियाचे उपपंतप्रधान हाजी मोहीयोद्दीन मोहमद यासीन, पेराचे मुख्यमंत्री डॉ़झांबरे अब्दुल कदीर यांची उपस्थिती होती़ मले भाषेवर संस्कृतचा प्रभावमलेशियातील प्रमुख मले भाषेवर संस्कृतचा प्रभाव दिसून येतो़ मलेशियन उपपंतप्रधान व मंत्र्यांच्या भाषणातील भाग्यम्, मंत्री, पूत्र, स्त्री, भूमीपूत्र, बहुमान यासह अनेक शब्द संस्कृत, मराठीशी अर्थासह जुळणारे आहेत़ उर्दू, हिंदीचाही उल्लेख होतो़