शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

कॅनडातही जपली जाते मराठमोळी संस्कृती; गुढीपाडवा व चैत्र गौरी हळदी-कुंकू समारंभ दिमाखात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 7:50 AM

सातासमुद्रापार  असलेल्या कॅनडात आपल्या मराठमोळ्या भारतीय महिलांनी संस्कृती जपली आहे. चैत्र गौरी हळदी कुंकू आणि गुढीपाडव्याचा दिमाखदार कार्यक्रम नुकताच मिसिसाका, टोराेंटो येथे वैदेही राऊत आणि प्रवीणा काळे यांनी आयोजित केला होता.

टोरोंटो :  

सातासमुद्रापार  असलेल्या कॅनडात आपल्या मराठमोळ्या भारतीय महिलांनी संस्कृती जपली आहे. चैत्र गौरी हळदी कुंकू आणि गुढीपाडव्याचा दिमाखदार कार्यक्रम नुकताच मिसिसाका, टोराेंटो येथे वैदेही राऊत आणि प्रवीणा काळे यांनी आयोजित केला होता.

१९७८ मध्ये भारतीय मराठी भाषिकांची संख्या खूप कमी होती. त्यावेळी येथील मराठी भाषिकांच्या मुलांना आपली संस्कृती समजण्यासाठी या कार्यक्रमांच्या आयोजनाची सुरूवात केली. आमची परंपरा वनिता मंडळातर्फे हा कार्यक्रम गेल्या ४० वर्षांपासून येथे आयोजित केला जातो आणि त्यांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो.

यावेळी सुमारे ३५० महिला उपस्थित होत्या आणि स्वच्छतेच्या अनेक पैलूंची काळजी घेण्यात आली होती . कॅनडात आलेल्या नवीन नागरिकांना भेटण्यासाठी आणि नवीन मित्र जोडण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले अशी माहिती प्रवीणा काळे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कौन्सलेट जनरल ऑफ इंडियाच्या अपूर्वा श्रीवास्तव जनरल कौन्सलेट ऑफ इंडिया होत्या. मुख्य पाहुण्यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले आणि आपली संस्कृती परदेशात जपली जाते हे पाहून त्यांना अभिमान वाटला. 

सुमारे ५ तास चाललेल्या या कार्यक्रमात हळदी कुंकू आणि वाण म्हणून उपस्थित महिलांना जोडवी दिली. कार्यक्रमात मस्ती, डान्स याचबरोबर खाद्यपदार्थ यांची रेलचेल होती.भिल्ल, लावणी फ्युजन आणि टपोरी गँग असे विविध सांस्कृतिक नृत्य यावेळी भारतीय महिलांनी सादर केले. 

गाण्यांद्वारे लता मंगेशकरांना श्रद्धांजली१.  उपस्थित प्रत्येक महिलेने लता मंगेशकर आणि बिरजू महाराज यांना २ मिनिटे मौन धारण करून आणि मोबाईल टॉर्च पेटवून आदरांजली वाहिली.२. मयुरा कुलकर्णी, चारूशीला कुंभेजकर, क्षितिजा तलफडे, अरुणा कर्णिक, सारिका गावंडे, शाकंबरी मोहरील, भारती लोकरे यांनी सादर केलेल्या नृत्याच्या रूपात लता मंगेशकरांची गाणी सादर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ३. खरेदीसाठी अनेक छोटे व्यवसायाचे स्टॉल्स येथे उपलब्ध होते. नुकताच व्यवसाय सुरू करणाऱ्यांना येथे चांगले प्रोत्साहन मिळाले अशी माहिती आयोजकांनी दिली.

टॅग्स :Canadaकॅनडा