शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

फेसबुकच्या नकारात्मक परिणामांबद्दल मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केली दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 11:23 PM

सोशल मिडीयाच्या नकारात्मक परिणामांबद्दल फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्‍त केली आहे. फेसबुकचा वापर समाजाला एकत्र आणण्याऐवजी त्यामध्ये फूट पाडण्याचे काम होत असल्याने आपल्याला क्षमा करण्यात यावी, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देमार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्‍त केली दिलगिरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या फायद्यासाठीच फेसबुकचा वापरमहत्वाच्या विषयांचाच प्रचार केला गेला

वॉशिंग्टन- सोशल मिडीयाच्या नकारात्मक परिणामांबद्दल फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्‍त केली आहे. फेसबुकचा वापर समाजाला एकत्र आणण्याऐवजी त्यामध्ये फूट पाडण्याचे काम होत असल्याने आपल्याला क्षमा करण्यात यावी, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्‍त कोणत्याही घटनेचा उल्लेख केला नाही. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या फायद्यासाठीच फेसबुकचा वापर करण्यात आला. यासाठी रशियातील नागरिकांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी फेसबुकचा उपयोग केल्याचे बोलले जात आहे. तसेच, रशियन नागरिकांनी फेसबुकचा वापर गेल्या दशकभरापासून असत्य पसरवण्यासाठी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच संदर्भात झुकेरबर्गने आपल्या फेसबुक पेजवरून ही दिलगिरी व्यक्‍त केल्याचे म्हटले जात आहे.  या वर्षात माझ्याकडून ज्यांना कुणाला दु:ख झाले. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. तसेच, यापुढे चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर लिहिले आहे. रशियाच्या 470 बनावट कंपन्यांनी जून 2015 ते मे 2017 दरम्यान फेसबुकवर केलेल्या जाहिराती अमेरिकेच्या संसदेला सादर केल्या जातील, असे फेसबुकने अलिकडेच म्हटले होते. या जाहिरातींमधून राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी थेट प्रचार करण्यात आला नव्हता. मात्र गे हक्क, वंश, शरणार्थी आणि शस्त्र बाळगण्याच्या हक्कासारख्या महत्वाच्या विषयांचाच प्रचार केला गेला होता.

टॅग्स :Facebookफेसबुक