शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
4
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
5
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
7
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
8
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
9
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
10
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
12
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
13
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
14
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
15
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
16
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
17
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
18
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
19
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
20
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड

लग्न, मुलं, कुटुंब अत्यंत आवश्यक; शी जिनपिंग यांनी महिलांना केलं खास आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:16 PM

सुखी कुटुंबासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिनपिंग यांनी म्हटल्याचे चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे.

सातत्याने कमी होत असलेल्या जन्मदराने चीनचे टेन्शन वाढवले आहे. यामुळे चीन सरकार एवढे अस्वस्थ झाले आहे की, राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी तेथील महिलांना लग्न करून अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सुखी कुटुंबासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिनपिंग यांनी म्हटल्याचे चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे.

जिनपिंग यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, चीनच्या महिलांची भूमिका केवळ त्यांच्याच विकासाशी संबंधित नाही तर, "कौटुंबिक सौहार्द, सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय विकास आणि राष्ट्रीय प्रगती"शीही संबंधित आहे. यासाठी, "विवाह आणि विवाहाची एक नवी संस्कृती तयार करणे आवश्यक आहे." एवढेच नाही, तर मुले जन्माला घालणे, लग्न आणि कुटुब संस्था यासंदर्भातील तरुणांचा दृष्टिकोण मजबूत व्हायला हवा, असेही जिनपिंग यांनी म्हटले आहे.

असं आहे चीनमधील घटत्या जन्मदराचं कारण -चीनमधील तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या पालन-पोषणाचा खर्च, नोकरी नसणे, लैंगिक भेदभाव आणि लग्न करण्याची इच्छा नसणे यांसह अनेक कारणांमुळे चीनमधील तरुणींना कुटुंब वाढविण्याची इच्छा नाही. जानेवारी महिन्यात, चीनमधील नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने सहा दशकांत प्रथमच लोकसंख्येमध्ये घट झाल्याची सूचना दिली आहे. एवढेच नाही, तर देशातील लोकसंख्या वेगाने म्हातारी होत आहे. चीनमधील जन्मदराचा आकडा, गेल्या वर्षी 10% ने घसरून विक्रमी निचांकावर आला आहे. राष्ट्रीय आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार, चीनमध्ये 2022 मध्ये केवळ 9.56 मिलियन जन्म झाले, 1949 नंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे.

टॅग्स :chinaचीनWomenमहिलाXi Jinpingशी जिनपिंग