शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

मसूद जिवंत...! नातेवाईकांच्या हवाल्याने पाकिस्तानी मीडियाच्या कोलांटउड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 8:07 AM

भारतीय हवाईदलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हवाई हल्ला चढविला होता. या हल्ल्यामध्ये मसूदचा भाऊ ठार झाल्याचे वृत्त होते.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा भारतीय हवाईदलाने चढविलेल्या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त रविवारी पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले होते. मात्र, आता मसूदच्या नातेवाईकांचा हवाला देत मसूद जिवंत असल्याचा दावा केला आहे. तसेच जैश ए मोहम्मदने देखिल हे वृत्त फेटाळले आहे.भारतीय हवाईदलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हवाई हल्ला चढविला होता. या हल्ल्यामध्ये मसूदचा भाऊ ठार झाल्याचे वृत्त होते. मात्र, रविवारी मसूदही ठार झाल्याचे वृत्त समाज माध्यमांवर वाऱ्यासारखे पसरले होते. याला पाकिस्तानी माध्यमांनीही दुजोरा दिला होता. मात्र, जैश आणि पाकिस्तानी सरकार यांच्याकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आता पाकिस्तानी माध्यमांनीही युटर्न घेतला असून मसूदच्या जवळच्या नातेवाईंकांचा हवाला देत तो जिवंत असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, मसूद अझहरच्या मृत्यूच्या वृत्तामुळे भारतीय गुप्तचर विभागही सक्रिय झाला असून या वृत्ताची सत्यता पडताळण्यात येत आहे. मसूद हा पाकिस्तानी लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही मसूद आजारी असल्याचे म्हटले होते, मात्र, कुठे आहे हे माहित नसल्याचे म्हटले होते.जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा पाकिस्तानातच असल्याची कबुली पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली आहे. पण, त्यांचे असे म्हणणे आहे की, भारताने ठोस पुरावे दिल्यासच सरकार त्याच्याविरुद्ध काही पावले उचलू शकते. दरम्यान, मसूद अझहर सध्या एवढा आजारी आहे की, घराच्या बाहेरही निघू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.मसूदला दहशतवादी घोषित करणार का?मसूद हा जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संस्थापक असून, ही संघटना मुख्यत्वे पाकव्याप्त काश्मीरमधून घातपाती कारवाया घडवत असते. पुलवामातील हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. त्यानंतर, मसूदवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली. पुलवामा हल्ल्यामागे जैश असल्याचे सर्व पुरावे भारताने पाकिस्तानला सुपुर्द केले आहेत. १९९९ साली हरकत-उल-मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे काठमांडूहून अपहरण करून ते अफगाणिस्तानातील कंदाहारला नेले होते. भारतात कैदेत असलेल्या मसूद अजहर व अन्य दोन दहशतवाद्यांची वाजपेयी सरकारने मुक्तता केल्यास विमानातील प्रवाशांची सुटका करण्यात येईल, अशी अट अपहरणकर्त्यांनी घातली होती. त्यानुसार, मसूदला मुक्त करण्यात आल्यानंतर तो पाकिस्तानात गेला होता. आयएसआयच्या मदतीने त्याने पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून भारतात घातपाती कारवाया सुरू केल्या.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकmasood azharमसूद अजहरPakistanपाकिस्तान