ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ८ - पठाणकोटमध्ये भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मोलाना मसूद अझरचा सहभाग नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. जानेवारीमध्ये पंजाबमधल्या पठाणकोटमध्ये पाकिस्तानातून आलेल्या सहा दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या तळावर हल्ला केला होता. जवळपास ८० तासांच्या चकमकीनंतर या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
हे दहशतवादी मौलाना मसूद अझरने पाठवले होते असे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आणि पाकिस्तानने कारवाई करावी अशी मागणी भारत सरकारने केली. भारताने याबाबतचा टेलिफोन कॉल रेकॉर्ड्सचा पुरावा पाकिस्तानला दिला असूनही पाकिस्तानने मात्र मौलाना मसूद अझरचा या हल्ल्याशी संबंध नसल्याची भूमिका घेतली असल्याचे वृत्त आहे.
पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा रद्द केल्या आहेत.