इस्लामाबाद : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा मुलगा हम्माद व भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ यांच्यासह बंदी घातलेल्या संघटनांच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील तपास यंत्रणांनी मंगळवारी अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकला अखेर हे पाऊल उचलावे लागले.यासंदर्भात पाकचे गृहमंत्री शहरयार खान आफ्रिदी म्हणाले की, दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकचे गृह सचिव आझम सुलेमान खान म्हणाले, पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या ज्या दहशतवाद्यांची नावे भारताने गेल्या आठवड्यात कळविली होती त्यात हम्माद व रौफ यांचीही नावे होती. भारताने ज्या दहशतवाद्यांचा उल्लेख केला होता, केवळ त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली असा अर्थ कोणीही काढू नये. त्या व्यतिरिक्तही अन्य संघटनांच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
मसूदचा मुलगा, भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 6:23 AM