शिकागो - अमेरिकेच्या शिकागोमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात लूटमार आणि हिंसाचाराची घटना घडली आहे. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी दुकानांची तोडफोड केली आहे. तसेच लूटमारीच्या घटनाही समोर आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 100 हून अधिक लोकांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस आणि लूटमार करणारे यांच्यामध्ये अनेक ठिकाणी गोळीबार देखील झाला आहे. या गोळीबारात 13 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.
शिकागोचे पोलिस प्रमुख डेव्हिड ब्राउन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हा संघटित निषेध नव्हता तर ही गुन्हेगारी घटना आहे. 25 मे रोजी पोलिसांच्या गोळीबारात जॉर्ज फ्लॉयड नावाच्या एका अश्वेत व्यक्तीचा मृत्यू झाला. तेव्हापासून हिंसाचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पुन्हा एकदा शिकागोजवळ एंगल-वुडमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि हिंसाचार सुरू झाला.
हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये एक तरुण जखमी झाला. या घटनेनंतर हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि परिस्थिती आणखी बिकट झाली. सोमवारी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि शॉपिंग मॉल्स, दुकानांमध्ये लूटमार करण्यास त्यांनी सुरुवात केली. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना अटक केली आहे. तर याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
शिकागोमधील ही परिस्थिती लक्षात घेऊन अनेक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मॅग्निफिसेंट माइल परिसरात मोठ्या प्रमाणात लूटमार करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील संस्था, दुकाने, हॉटेल्स यांचं खूप नुकसान झालं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेत पोलिसांच्या ताब्यातील एका अश्वेत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर निदर्शने सुरू झाली आहेत. त्यानंतर अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण"
कोरोनाच्या संकटात रेल्वे देणार 5000 हून अधिक नोकऱ्या?, जाणून घ्या 'त्या' जाहिरातीमागचं सत्य
CoronaVirus News : कोरोनावर मात केल्यावर शिवराज सिंह चौहान करणार प्लाझ्मादान
शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीला बंदी, FSSAI चा मोठा निर्णय
शाब्बास पोरी! सर्व विषयात जबरदस्त गुण पण गणितात मात्र 2, पुनर्तपासणीत मिळाले पैकीच्या पैकी