चीनमध्ये बुधवारी रात्री मोठी घटना घडली आहे. यिनचुआन प्रांतात एका रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला आहे. या घटनेत ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सात जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
ग्लोबल टाईम्सनुसार उत्तर पश्चिमी चीनच्या यिनचुआनमध्ये बुधवारी रात्री बार्बेक्यु रेस्टॉरंटमध्ये गॅसचा स्फोट झाला. यामध्ये ३१ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
चिनी माध्यमांमध्ये मदत कार्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. ज्यामध्ये स्फोटाची तीव्रता दिसत आहे. स्फोटानंतर आजुबाजुच्या दुकानांनाही आग लागली होती. रेस्टॉरंटमध्ये आग कशी लागली याची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत ३८ लोकांना वाचविण्यात आले आहे. तर सात जण जखमी आहेत.