Explosions in Iran At Least 73 People Dead: इराणचे माजी जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ दोन भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सुलेमानीच्या स्मृतीदीनानिमित्त लोक जमले होते. या स्फोटात 105 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय, तर 170 पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले आहेत. केरमन शहरातील स्मशानभूमीजवळ हा स्फोट झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे माजी जनरल कासीम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदीनानिमित्त केरमन शहरातील स्मशानभूमीजवळ लोक जमले होते. यावेळी अचानक दोन भीषण स्फोट झाले. या स्फोटात किमान 105 लोकांचा मृत्यू झाला तर 170 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळेही अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा स्फोट नेमका कशामुळे झाला? हा सामान्य स्फोट होता की, दहशतवादी हल्ला होता, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून, या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कोण होता कासीम सुलेमानी?कासीम सुलेमानी यांनी दोन दशकांहून अधिक काळ इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ची विदेशी ऑपरेशन्स शाखा असलेल्या कुड्स फोर्सचे नेतृत्व केले. जानेवारी 2020 मध्ये इराकमध्ये अमेरिकन हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. इराणचे सुप्रीमो अयातुल्ला खुमैनी यांच्यानंत सुलेमानी दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता. सुलेमानीच्या मृत्यूला डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात मोठे यश म्हटले होते.