इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. येथील लोकांची गहू आणि पीठासाठी मारामार होत आहे. येथे महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. जानेवारी २०२२ मध्ये महागाई १३ टक्केच्या दराने वाढत होती, सध्या ती २५ टक्केच्या दराने वाढत आहे.
पाकवर संकट ओढावल्याने सौदी अरेबिया, रशिया, आदी देशांनी पाकला मदतीचा हात पुढे केला आहे. सौदी अरेबियाने पाकमधील त्यांची गुंतवणूक १० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविली आहे. त्याचवेळी गव्हाने भरलेली दोन रशियन जहाजे कराची बंदरात पोहोचली आहेत. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात पाकमध्ये निदर्शने होत आहेत.
केवळ तीन आठवडे...
पाकिस्तान केवळ तीन आठवड्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंची आयात करू शकणार आहे. देशात मूलभूत गोष्टींचा तुटवडा आहे. त्यांची अवस्था श्रीलंकेसारखीच असू शकते, असे दिसते. डॉलरच्या तुटवड्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडण्याची भीती पाकिस्तानातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
किती वाढल्या वस्तूंच्या किमती
(पाकिस्तानी रुपयात किंमत प्रती १ किलो) ६ जाने २२ ५ जाने २३ कांदा ३६ २२०चिकन २१० ३८३डाळ १५० २२८मीठ ३२ ४९बासमती तांदूळ ३६ २२०ग्रेटर नोएडा ३७४ ५३२ब्रेड १ पॅकेट ६५ ८९दूध १ लिटर ११४ १४९