सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पहिल्यांदा पाहिल्यावर कुठल्या तरी चित्रपटाचा सीन आहे की काय असं वाटेल पण तसं नाही. ही खरी घटना आहे. यामध्ये लोक त्यांच्या मुलांसह जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. मागून आगीच्या ज्वाळा आणि धुराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारी आग एका टँकरच्या स्फोटानंतर लागली. ही घटना नायजेरियातील ओडो राज्यातील आहे. सोमवारी येथे भीषण आग लागली होती. यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका स्थानिक मीडिया आउटलेटने सांगितले की किमान 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये तीन मुलं आणि एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. लागोस-बेनिन द्रुतगती मार्गाव हा स्फोट झाला.
स्फोटामुळे भीषण आग लागली आणि धुराचे लोट आकाशात पसरले. त्याचा परिणाम संपूर्ण परिसरावर झाला आहे. आजूबाजूचे लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. हा व्हिडीओ आतापर्यंत 7 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. मोठ्या संख्येने लोक व्हिडीओ शेअर करत आहेत. यासोबतच लोकांनी यावर कमेंट करताना आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.