ऑनलाइन लोकमत
पेन्सिलवेनिया, दि. 15 - अमेरिकेच्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणित या विषयाचा घरचा अभ्यास देण्यात आला होता. आश्चर्य म्हणजे गणितावर प्रश्न विचारण्याऐवजी लैंगीक शोषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला.
अमेरिकेची प्रसीद्ध लेखिका माया एंजेलोच्या जीवनाशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला होता. 'एंजेलोचं वयाच्या आठव्या वर्षी लैंगिक शोषण झालं होतं यामुळे तिच्या करिअरला वेगळी दिशा मिळाली आणि तिला लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली' या प्रश्नाचं उत्तर बिजगणितातील सूत्र वापरून शोधण्यास सांगितलं गेलं. उत्तरासाठी बॉयफ्रेंड, ब्रदर आणि पिता अशे पर्यायही देण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता शाळेकडून यावर माफी मागण्यात आली. पेन्सिलवेनिया येथील एका शाळेत ही घटना घडली.