शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

मतीनची ‘इसिस’शी निष्ठा

By admin | Published: June 14, 2016 4:33 AM

ओरलँडो येथील समलैंगिकांच्या नाइट क्लबवर हल्ला करून ५० जणांना ठार मारणाऱ्या ओमर मतीन (२९) याने अमेरिकेत आणीबाणीच्या प्रसंगात वापरल्या जाणाऱ्या ९११ या

वॉशिंग्टन : ओरलँडो येथील समलैंगिकांच्या नाइट क्लबवर हल्ला करून ५० जणांना ठार मारणाऱ्या ओमर मतीन (२९) याने अमेरिकेत आणीबाणीच्या प्रसंगात वापरल्या जाणाऱ्या ९११ या क्रमांकाद्वारे इसिसशी निष्ठा व्यक्त केली होती. या नाइट क्लबवर सुरुवातीला हल्ला केल्यानंतर त्याने ९११ या क्रमांकावर इस्लामिक स्टेटचा नेता अबू बकर अल बगदादी याच्याशी निष्ठा व्यक्त केली होती, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली. या फोन संभाषणात मतीन याने बोस्टन बाँबर्स त्सार्नाएव्ह बंधुंबद्दल निष्ठा व्यक्त केली होती. २०१३ मध्ये या बंधुंनी बोस्टन मॅरेथॉनमध्ये बाँबस्फोट घडविले होते. मतीनने गे क्लबच्या बाथरूममधून ९११ क्रमांकावर फोन करून स्वत:चे पूर्ण नाव त्याला सांगितले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. अध्यक्ष बराक ओबामा यांनी गे क्लब हत्याकांड हे दहशतवादी व द्वेषातून घडवलेले कृत्य असल्याचे म्हटले. फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या हत्याकांडाची दहशतवादी कृत्य या अंगाने चौकशी करीत आहे, असे ओबामा म्हणाले. हे हत्याकांड संघटित आणि पूर्ण तयारीने घडविल्याचे दिसते, असे ओरलँडोचे पोलीस प्रमुख जॉन मिना यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)काही दिवसांपूर्वीच शस्त्रास्त्रांची खरेदीआम्हाला या गुन्ह्यातील साथीदार सापडलेले नाहीत, असे ओरलँडो पोलिसांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मतीन यापूर्वी एफबीआयच्या रडारवर होता. एफबीआयने त्याची २०१३ व २०१४ मध्ये उलटतपासणीही घेतली होती, परंतु त्यात त्याच्याविरोधात आक्षेपार्ह काही सापडले नव्हते. २००७ पासून मतीन जीफोर एस सिक्युअर सोल्युशन्स कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कामाला होता. या कंपनीने या हत्याकांडामुळे धक्का बसला असल्याचे सांगून, तपासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मतीनने गेल्या दोन आठवड्यांत ग्लोक पिस्तूल आणि लाँग गन विकत घेतल्याची माहिती दहशतवादविरोधी दलाचे ट्रेव्हर व्हेलिनोर यांनी दिली. हत्याकांडामागील हेतूचा शोध अजूनही अधिकाऱ्यांना लागलेला नाही. ‘इसिस’ने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली असली, तरी याला पूरक ठरेल, असा पुरावा एफबीआयला अद्याप सापडलेला नाही.