प्रश्न- माझ्या पासपोर्टची मुदत संपणार आहे. तरीही मी इमिग्रंट व्हिसासाठी मुलाखत देऊ शकतो का? या पासपोर्टवर इमिग्रंट व्हिसा छापण्यात येईल का?
उत्तर- होय, तुम्ही तुमच्या वैध पासपोर्टसह इमिग्रंट व्हिसा मुलाखतीला हजर राहू शकता. मात्र व्हिसा मिळण्यापूर्वी तुम्हाला नवा पासपोर्ट काढावा लागू शकतो.
तुमचा मेडिकल क्लिअरन्स केव्हा पूर्ण होतो, त्यावर तुमच्या इमिग्रंट व्हिसाची वैधता ठरते. ती साधारणत: सहा महिने असते.
जर पासपोर्ट वैद्यकीय मंजुरीच्या वैधतेनंतरच्या ६० दिवसांनंतर वैध नसेल, तर अधिकारी व्हिसाची वैधता सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीपर्यंत मर्यादित ठेऊ शकतो. अशा वेळी, अर्जदारानं व्हिसा वैधतेच्या मर्यादित कालावधीत अमेरिकेत प्रवास करावा. या कालावधीत अर्जदार प्रवास करू शकल्यास, अधिकारी अर्जदाराला २२१ (जी) नकार पत्र देईल. अर्जदाराला नव्या पासपोर्टची गरज असल्याचं त्यावर नमूद असेल.
पासपोर्ट जारी झाल्यावर तो पुन्हा जमा करण्यापूर्वी तुमचं वैद्यकीय आणि पोलीस मंजुरी प्रमाणपत्र अद्याप वैध असल्याची खात्री करून घ्या. अनावश्यक उशीर किंवा मर्यादित व्हिसा टाळण्यासाठी मुलाखतीआधी नव्या पासपोर्टसाठी अर्ज करा आणि तुम्ही नव्या पासपोर्टसाठी अर्ज केल्याची माहिती दूतावासातील अधिकाऱ्याला द्या.
अधिक माहितीसाठी, इमिग्रंट व्हिसा मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी कृपया travel.state.gov या संकेतस्थळाला भेट द्या.
महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.