पॅरिस : फ्रान्सचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष अमॅन्युएल मॅक्रॉन यांनी निम्म्या मंत्रिपदांवर (२२ पैकी ११) महिलांची नियुक्ती करून निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले आहे. एवढेच नाहीतर त्यांनी संरक्षणमंत्रीपदासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण पदासाठीही महिलेची निवड करून राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का दिला. मॅक्रॉन यांच्या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाचा संसदेत एकही सदस्य नाही. आता त्यांना संसदीय निवडणुकीत बहुमत मिळविण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. संसदीय निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षाने आतापर्यंत ४२८ उमेदवार जाहीर केले असून त्यातही निम्म्या महिला आहेत. याआधीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉई मितराँ यांच्या मंत्रिमंडळातही ३४ पैकी निम्म्या महिला होत्या. (वृत्तसंस्था)
मॅक्रॉन मंत्रिमंडळात निम्मी पदे महिलांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 2:09 AM