शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
3
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
4
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
5
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
6
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
7
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
8
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
9
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
10
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
11
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
12
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
13
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
14
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
15
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
16
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
17
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
18
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
19
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
20
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ३0 डिसेंबरनंतरही उपाययोजना

By admin | Published: November 13, 2016 4:48 AM

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ३0 डिसेंबरनंतर आणखी उपाय करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिले. काळा पैसा बाळगणाऱ्यांना आता कुठल्याही परिस्थितीत

कोबे : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ३0 डिसेंबरनंतर आणखी उपाय करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिले. काळा पैसा बाळगणाऱ्यांना आता कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे मोदी म्हणाले. प्रामाणिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. हजार-पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय हे ‘स्वच्छ भारत अभियान’च आहे, असे ते म्हणाले.जपानमधील कोबे शहरात भारतीय समुदायासमोर बोलताना मोदी यांनी वरील वक्तव्य केले. रद्द करण्यात आलेल्या हजार-पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना ३0 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे; मात्र त्यानंतरही काळा पैसा शोधून काढण्यासाठी नव्या योजना येऊ शकतील, असा इशारा त्यांनी दिला. मोदी म्हणाले की, मी पुन्हा एकदा जाहीरपणे सांगू इच्छितो की, ही योजना संपल्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांना धक्क्याला लावण्यासाठी पुन्हा नवी योजना येणार नाही, असे गृहीत धरू नका. काही हिशेबाबाहेरचे समोर आलेच, तर मी स्वातंत्र्यापासूनचे सगळे रेकॉर्ड चेक करेन. त्यासाठी लागतील तेवढे लोक मी तैनात करेन. प्रामाणिक लोकांना कोणताही त्रास होणार नाही; मात्र दोषींना कोणत्याही स्थितीत सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)आशीर्वाद मिळतील, असे वाटले नव्हतेराष्ट्रहित लक्षात घेऊन लोक सहा-सहा तास रांगेत उभे राहून नोटा बदलून घेत आहेत. मी माझ्या देशवासीयांना सलाम ठोकतो. २0११नंतरच्या संकटानंतर जपानी लोकांनीही अशाच धैर्याचे प्रदर्शन केले होते. ही योजना आणल्यानंतर काय अडचणी येऊ शकतात याचा मी दीर्घ काळ व गंभीर विचार केला. योजना गोपनीय ठेवणेही महत्त्वाचे होते. ती अचानक जाहीर करणे आवश्यक होते; पण मला त्यातून आशीर्वाद मिळतील, असा विचार मी केला नव्हता, असेही पंतप्रधान म्हणाले. नोटांबाबत गैरसोय सोसून लोक निर्णयाचे स्वागत करत आहेत!गंगेत हजार-पाचशेच्या नोटा वाहत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यासंदर्भाने मोदी म्हणाले की, जे लोक मला ओळखतात, ते हुशारही आहेत. काळा पैसा बँकेत भरण्याऐवजी गंगेत नेऊन टाकलेला बरा असा विचार ते करीत आहेत. गैरसोय सोसून लोक पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत आहेत.