हनोई : व्हिएतनामच्या डोंगरी भागात खाऊ वाय या गावात दरवर्षी ‘लव्ह मार्केट’चे आयोजन करण्यात येते. जुने प्रेमीयुगुल येथे भेटतात. यामागची कथा अशी आहे की, फार वर्षांपूर्वी गिए जमातीची एक मुलगी नुंग जमातीच्या एका मुलासोबत प्रेम करू लागली; पण गिए जमातीच्या लोकांनी स्पष्ट सांगितले की, अन्य जमातीत आम्ही मुलगी देणार नाही. यातून संघर्ष उफाळला आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रेमीयुगुलाने असे ठरविले की, आपण एकमेकांपासून दूर होऊन हा रक्तपात थांबवू. त्यानंतरही हे प्रेम मात्र कमी झाले नाही. दरवर्षी ते या ठिकाणी भेटण्यासाठी येत होते. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. आता अशा प्रेमीयुगुलांसह येथे पर्यटक दरवर्षी तिसऱ्या महिन्यात एकत्र येतात.
लव्ह मार्केटमध्ये भेटतात जुने प्रेमीयुगुल
By admin | Published: February 10, 2017 12:57 AM