नवी दिल्ली- पृथ्वीच्या इतिहासाचे टप्पे हा नेहमीच संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. मात्र नुकत्याच एका संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात आधुनिक टप्प्याला 'मेघालय युग' असे नाव दिले आहे.हे नाव मेघालय राज्यातील 'मॉवम्लुह' या गुहेतील' स्टॅलॅगमाईट'वरुन पडलेले आहे. ज्यावेळेस चुनखडकाच्या गुहेमध्ये पाण्याचे थेंब पडत असलेल्या ठिकाणी पाण्याचे बाष्पीभवन होऊन केवळ क्षारांचे संचयन मागे राहाते तेव्हा त्या गुहेत जमिनीवर क्षारांचे खांब तयार होतात त्यास 'स्टॅलॅगमाईट' असे म्हणतात. ही प्रक्रीया होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. ज्यावेळेस हे थेंब थेंब पाणी पडून गुहेच्या छताला लटकणारे खांब तयार होतात तेव्हा त्यास स्टॅलॅकमाइट असं म्हटलं जातं.
लोकहो! हे कलियुग नाही, तर 'मेघालय युग'; शास्त्रज्ञांनी लावला महत्त्वपूर्ण शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 2:21 PM