पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील (PNB Scam) फरार आरोपी मेहुल चोकसीने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, भारतात आपल्या सुरक्षेबाबत तो घाबरलाय. मला भारतात यायचं आहे, पण डोमिनिका कोर्टाने मला सध्या एंटीगामध्ये राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती त्याने दिली.दरम्यान, डोमिनाका कोर्टाने उपचार घेण्यासाठी मेहुलला जामीन मंजुर केला आहे. तसेच, त्याला उपचार घेण्यासाठी एंटीगाला जाण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
मीडियाशी संवाद साधताना मेहुल चोकसी म्हणाला की, 'मी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी भारतात येण्याचा विचार करत होतो. पण, डोमिनिका कोर्टानं मला एंटीगामध्येच राहण्यास सांगितलं आहे. मी आता बाहेर जाऊ शकत नाही. माझ्या अपहरणातील ते 50 दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात काळे दिवस होते. भारतात येण्याचा मी विचार करत होतो. पण तिथे सुरक्षा मिळेल की नाही, याबाबत मला संशय आहे.
अपहरण केल्याचा चोकसीचा दावा25 मे रोजी मेहूल एंटीगामधून अचानक बेपत्ता झाला होता. काही दिवसानंत त्याला डोमिनिकामध्ये अधिकाऱ्यांनी अवैधरित्या घुसल्याच्या आरोपाखाली अटक केली. परंतु, मेहुलने अपहरण करुन त्याला डोमिनिकामध्ये आणल्याचा दावा केला होता. तसेच, अपहरणकर्त्यानं मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला होता. नुकतंच त्याने एक ऑडिओ क्लिप जारी करुन भारतीय एजंसीजवर अपहरणाचा आरोप लावला आहे.
पीएनबी घोटाळ्यातील आरोपीफरार मेहुल चोकसीवर पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची माहिती उघड झाल्यानंतर तो एंटीगामध्ये पळून गेला होता. अनेक दिवस तो तिथेच राहिला. पण, मे महिन्यात तो डोमिनिकामध्ये गेला. पोलिसांनी तिथे त्याला अटक केली.