न्यूयॉर्क - भारतातून फरार झालेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चौकसीचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता वाढली आहे. मेहूल चोकसी हा लबाडच असल्याचे सांगत अँटिग्वा आणि बर्बुडाच्या पंतप्रधानांनी मेहूल चौकसीच्या प्रत्यार्पणाचे संकेत दिले आहे. मेहूल चौकसीने केलेल्या गुन्ह्यांबाबत आम्हाला पुरेशी माहिती मिळाली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येईल, असे आश्वासन अँटिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी दिले आले. मेहूल चोकसी हा सध्या अँटिग्वामध्ये लपला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या संमेलनात सहभाग घेण्यासाठी न्यूयॉर्क येथे आलेले अँटिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांच्याकडे मेहूल चोकसीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, ''मेहूल चोकसी हा लबाड असल्याची पुरेशी माहिती मला मिळाली आहे. मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे सध्या याबाबत आम्ही काही करू शकत नाही. मात्र मेहूल चोकसीला अँटिग्वा आणि बर्बुडामध्ये ठेवण्याची आमची इच्छा नाही.''
मेहूल चोकसी लबाडच, त्याचे लवकरच भारताकडे प्रत्यार्पण करणार, अँटिग्वाच्या पंतप्रधानांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 8:54 AM