रोसेऊ: पंजाब नॅशनल बॅकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहे. डोमिनिका येथील उच्च न्यायालयात मेहुल चौक्सीला केलेल्या अटकेसंदर्भात खटला सुरू आहे. यावरील सुनावणीवेळी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात मेहुल चोक्सीने अजब दावे केले आहेत. मी कायदा पाळणारा व्यक्ती असून, उपचारांसाठी भारत सोडला होता, असे मेहुल चोक्सीने म्हटले आहे. (mehul choksi told dominica high court that i am a law abiding citizen and will not escape)
मी कायद्याचे पालन करणारा व्यक्ती आहे. डोमिनिका सोडून कुठेही जाणार नाही, असे मेहुल चोक्सीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याआधी न्यायदंडाधिकाऱ्यांनी मेहुल चोक्सीला जामीन नाकारला होता. त्यानंतर आता डोमिनिका येथील उच्च न्यायालयात मेहुल चोक्सीच्या खटल्यावर सुनावणी सुरू आहे.
उपचार घेण्यासाठी भारत सोडला
मेहुल चोक्सीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, मी उपचारांसाठी भारत सोडला. जेव्हा भारत सोडला, तेव्हा त्याच्याविरोधात देश न सोडण्यासंदर्भात कोणतेही वॉरंट जारी करण्यात आलेले नव्हते. कायद्याचे पालन करणारा व्यक्ती असल्यामुळे जामीन मिळाल्यास डोमिनिका सोडून कुठेही जाणार नाही. तसेच माझ्यावरील आरोपांवर माझी कोणतीही मुद्द्यावर चौकशी करावी. मी भारताच्या तपास संस्थांपासून पळून आलेलो नाही, असे मेहुल चोक्सीने सांगितले आहे.
दरम्यान, मेहुल चोक्सीने केलेली याचिका वैध नसून, त्याला भारताकडे सोपवावे, अशी स्पष्ट भूमिका डोमिनिका सरकारने न्यायालयात मांडली आहे. भारतानेही मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी कायदेशी प्रक्रियेला वेग दिल्याचे सांगितले जात आहे. हुल चोक्सीने आपलं अपहरण करुन डोमिनिकाला नेल्याचा आरोप केला होता. मेहुल चोक्सी भारतातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा मामा आहे. हे दोघेही १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत.