शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

तुझं माझं पॅच अप! अखेर मेलेनियांनी डोनाल्ड ट्रम्प यांना केला स्पर्श

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 9:09 AM

ट्रम्प आणि मेलेनिया यांच्यातील दुरावा संपल्याचे दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांच्या नात्याची प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा असते. या दोघांमध्ये बराच दुरावा असल्याचे म्हटले जाते. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या छायाचित्रांमुळे ट्रम्प आणि मेलेनिया यांच्यातील दुरावा संपल्याचे दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांनी नुकतीच फ्लोरिडा येथील शाळेत माथेफिरूने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या मुलाची भेट घेतली. यानंतर ट्रम्प दाम्पत्याने वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी एका डिस्को पार्टीला हजेरी लावली होती. त्यावेळी ट्रम्प आणि मेलेनिया एकमेकांच्या अगदी जवळ बसल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये मेलेनिया आपल्या पतीच्या खांद्यावर रेलून बसल्याचेही दिसत आहे. साहजिकच इतके दिवस मेलेनियांनी ट्रम्प यांचा हात झिडकारल्याच्या बातम्या करणाऱ्या प्रसारमाध्यमांमध्ये या नव्या छायाचित्राचीही चर्चा रंगली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याची गोष्ट नवीन नाही. मध्यंतरी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत शरीरसंबंध असल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी आपल्या वकीलामार्फत स्टॉर्मी डॅनियल्सला 1लाख 30 हजार डॉलर दिले होते. ट्रम्प यांची पत्नी आणि अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प बाळंत झाल्यानंतर ट्रम्प आणि स्टॉर्मीच्या नात्याची सुरुवात झाली होती असे म्हटले जाते. या सगळ्यामुळे मेलेनिया प्रचंड नाराज होत्या.

मेलेनिया यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर ट्रम्प यांना तोंडघशी पाडल्याचे प्रकार घडले आहेत. मध्यंतरी परदेश दौऱ्यांच्यावेळी ट्रम्प आणि मेलेनिया एकत्र चालत असताना घडलेल्या प्रकारांमुळे प्रसारमाध्यमांना आयतेच खाद्य मिळाले होते. ट्रम्प यांनी फर्स्ट लेडीचा हात हातात धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा मेलेनिया त्यांचा हात झिडकारून दिला होता. हे असे पहिल्यांदा घडलेले नाही. यापूर्वीही अनेकदा मेलेनियाने ट्रम्प यांचा हात झिडकारला आहे. त्यानंतर प्रत्येकवेळी ट्रम्प सर्व काही आलबेल आहे, असे दाखवण्याचा प्रयत्नही करतात. परंतु, तोपर्यंत चाणाक्ष प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात हे क्षण कैद झालेले असतात. त्यानंतर हे व्हिडिओ प्रचंड व्हायचे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पMelania Trumpमेलेनिया ट्रम्प