मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडडर आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स (Bill Gates) यांनी लग्नाच्या २७ वर्षांनंतर पत्नी मेलिंडा (Melinda Gates) यांना २०२१ मध्ये घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. आता मेलिंडा यांनी पहिल्यांदाच बिल गेट्ससोबत घटस्फोटाच्या कारणांवर भाष्य केलं. मेलिंडा या बिल गेट्सच्या अफेअर बाबत बोलल्या आणि त्या म्हणाल्या की, बिल यांना यासाठी माफही केलं होतं. पण तरीही एका वेळेनंतर दोघांच्या नात्यात काही राहिलं नव्हतं.
मेलिंडा गेट्सने सीबीएस न्यूज मॉर्निंग शोमध्ये 'सीबीएस मॉर्निंग' मध्ये गेल किंगला मुलाखत दिली. ज्यात त्या बिल गेट्स यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत म्हणाल्या की, 'मी निश्चितपणे माफ करण्यावर विश्वास ठेवते. त्यामुळे मला वाटलं होतं की, आम्ही पुन्हा आमचं नातं सुरळीत करू शकतो'.
मेलिंडा यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर बिल यांच्या प्रवक्त्याने बिल गेट्स यांच्या २० वर्ष जुन्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची माहिती दिली होती. मेलिंडासोबत लग्न केल्यावरही बिल यांचं हे अफेअर सुरू होतं.
मेलिंडा पुढे म्हणाल्या की, 'ते काही एकटं कारण नव्हतं किंवा एक अशी गोष्ट नव्हती जी आमच्यात झाली. एक वेळ अशीही आली जेव्हा आमच्या दोघात काहीच शिल्लक राहिलं नाही आणि मला वाटलं हे ठीक नाही. आमच्यात जे काही झालं त्यानंतर मी विश्वास ठेवू शकत नव्हती'.
मेलिंडा म्हणाल्या की, जेव्हा त्या बिलपासून वेगळ्या झाल्या तेव्हा अनेक दिवस त्या रडल्या. त्यांच्या आयुष्यात अनेक असे क्षण आले जेव्हा त्यांना आपलं लग्न तुटण्यावर राग आला होता. त्या म्हणाल्या की, 'तो माझ्यासाटी शॉकचा काळ होता'.
त्या म्हणाल्या की, आता त्या या दु:खातून बाहेर पडत आहेत आणि आयुष्यात पुढे जात आहे. आता त्या जीवनाच्या दुसऱ्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आता ठीक होत आहेत. त्या म्हणाल्या की, 'मला असं वाटत आहे की, मी माझ्या आयुष्याच्या नव्या चॅप्टर पान पलटत आहे. म्हणजे आपण आता २०२२ सालात आलो आहोत. मी फार उत्साही आहे की, जीवनात पुढे काय होणार आहे'.
मे २०२१ मध्ये बिल आणि मेलिंडा यांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा करताना सांगितलं होतं की, बराच विचार केल्यावर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच दोघे असंही म्हणाले होते की, आपल्या चॅरिटेबल फाउंडेशनमध्ये सोबत मिळून काम करतील.