बीजिंग : इंटरपोलचे माजी अध्यक्ष मेंग होंग्वेई यांची लाचखोरी व अन्य गुन्ह्यांसंदर्भात चौकशी सुरूअसल्याचे चीनच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात सोमवारी म्हटले आहे. राजकीय आज्ञांचे उल्लंघन केल्यामुळे ते अडचणीत आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यासंदर्भात एका सरकारी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, होंग्वेई हे स्वत:च्या कृत्यांनी अडचणीत सापडले आहेत. त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले असून राजकीयदृष्ट्या अप्रामाणिक वर्तन केले आहे असे त्यात म्हटले आहे. मात्र त्यांनी नेमके कोणते कायदे धाब्यावर बसवले याची माहिती मात्र देण्यात आलेलीनाही.याआधी चीनच्या सार्वजनिक सुरक्षा खात्याच्या उपमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेले व कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य असलेले होंगवेई यांच्यावर चीनमधील सत्ताधारी विलक्षण नाराज आहेत. त्यांच्या चौकशीबाबत चर्चा करण्यासाठी विद्यमान सार्वजनिक सुरक्षा मंत्री झाओ लेझी यांच्या अध्यक्षतेखाली या खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयांची सोमवारी सकाळी एक बैठक पार पडली. (वृत्तसंस्था)
इंटरपोलचे माजी अध्यक्ष मेंग यांच्यावर लाचखोरीचा आरोप; अप्रामाणिक वर्तन केल्याचाही आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 1:12 AM