शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

मेरी ख्रिसमस

By admin | Published: December 26, 2014 12:00 AM

नाताळच्या निमित्ताने लहानग्यांना मिळालेल्या गिफ्टनी त्यांच्यात कमालीचे आनंदाचे वातावरण होते. तसेच सुटी असल्याने काही पालकांनी मुलांना घेऊन बाहेरगावी जाण्याचा बेत केला. याचबरोबर नवनवीन कपडे खाऊ यांची चंगळ होतीच.काल रात्रीपासूनच व्हॉट्सअँप आणि इतर सोशल साइट्सवर "मेरी ख्रिसमस"चे शुभेच्छा संदेश देण्यात आले. त्याचबरोबर अनेक व्हिडीओ आणि फोटोंचे कोलाज करून काहींनी ते अपलोड ...

नाताळच्या निमित्ताने लहानग्यांना मिळालेल्या गिफ्टनी त्यांच्यात कमालीचे आनंदाचे वातावरण होते. तसेच सुटी असल्याने काही पालकांनी मुलांना घेऊन बाहेरगावी जाण्याचा बेत केला. याचबरोबर नवनवीन कपडे खाऊ यांची चंगळ होतीच.

काल रात्रीपासूनच व्हॉट्सअँप आणि इतर सोशल साइट्सवर "मेरी ख्रिसमस"चे शुभेच्छा संदेश देण्यात आले. त्याचबरोबर अनेक व्हिडीओ आणि फोटोंचे कोलाज करून काहींनी ते अपलोड केले. शहरातील अनेक कार्यालयेही ख्रिसमसच्या सेलीब्रेशन मूडमध्ये होती. विजेची रोषणाई ख्रिसमस ट्री सजले होते तर काही ठिकाणी सांताक्लॉज गिफ्ट वाटत होते.

ख्रिसमसनिमित्त एकमेकांच्या घरी जाऊन केक चॉकलेट आणि विविध भेटवस्तू देऊन आनंद साजरा केला. त्याचबरोबर ठिकठिकाणी संगीताच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. नाताळनिमित्त शहरातील तारांकित हॉटेलांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सिलिगुडीमध्ये सेंट मेरी चर्चबाहेर साजरा करण्यात आलेला ख्रिसमस.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना इस्लामी कट्टरतावादी त्रास देत असल्याच्या पार्श्वभूमीवरही लाहोरमधल्या कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिश्चनांनी ख्रिसमस साजरा केला आणि शांततेसाठी प्रार्थना केली.

गुलाबी थंडीच्या वातावरणात मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असलेला नाताळ सण आला. झमगत्या मॉल्समध्ये ख्र्रिसमस ट्रीसह सांताक्लॉज अवतरले.

ख्रिसमसनिमित्त गुरूवारी व्हॅटिकनमध्ये सेंट पिटर बॅसिलिकाच्या सज्जातून पोप फ्रान्सिस यांनी पांरपारिक " उर्बी एट ओर्बी" हे आशीर्वादपर मार्गदर्शन केले. पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनमध्ये जमलेल्या मोठ्या जनसमुदायास संबोधित करताना ‘कारुण्य’ आणि ‘सहृदयता’ या भावनेचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

ख्रिश्चनांचा सर्वात मोठा नाताळ सण अर्थात प्रभू येशूंचा जन्मोत्सव गुरुवारी जगभरात मोठ्या उत्साहाने व जल्लोषात साजरा करण्यात आला.

बायबलच्या काळातली बेथेलहॅममधल्या वेस्ट बँक शहरात येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्याचे मानण्यात येते. त्या ठिकाणचे ख्रिसमसच्या रात्रीचे हे दृष्य.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पोप फ्रान्सिसनी व्हॅटिकन सिटीमध्ये बेबी येशूच्या पुतळ्याचे अनावरणकेले व चुंबन घेत आदर व्यक्त केला.