वॉशिंग्टन: आपल्या पृथ्वीकडे एक मोठं संकट झेपावत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार, 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा तीनपट मोठ्या आकाराचा एक उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येतोय. लवकरच हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल होईल.
शास्त्रज्ञांचे 60 दिवसांपासून लक्ष
नासानं दिलेल्या माहितीनुसार, या उल्कापिंडाचे नाव 2021 NY1 असून, हा 33659 किलोमीटर प्रति तासांच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. गेल्या 60 दिवसांपासून शास्त्रज्ञ या उल्कापिंडावर लक्ष ठेवून आहेत. 2021 NY1 पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या 17 Near-Earth objects पैकी एक आहे.
पृथ्वीवर धडकण्याची शक्यता कमीनासाने पुढे सांगितलं की, 2021 NY1 उल्कापिंडाचा व्यास 130-300 मीटर आहे. शास्त्रज्ञांना आशा आहे की, हा पृथ्वीच्या दिशेने येत असला तरी, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर पृथ्वीवर न आदळता, बाजूने निघून जाईल. 22 सप्टेंबरला हा उल्कापिंड पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करू शकतो.