शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

बाटलीतून बालकांना दूध भरविण्याची पद्धत प्रागैतिहासिक काळापासून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 3:48 AM

बवेरियामध्ये (जर्मनी) दफनस्थानातील थडगी खोदण्यात आली, त्यावेळी बाळांना पोषक पेय देण्यासाठी वापरली जाणारी ही भांडी आढळून आली.

बवेरियामध्ये (जर्मनी) दफनस्थानातील थडगी खोदण्यात आली, त्यावेळी बाळांना पोषक पेय देण्यासाठी वापरली जाणारी ही भांडी आढळून आली. ख्रिस्तपूर्व ४५० ते १२०० दरम्यानची ही भांडी आहेत. बालकांना सहज हातात धरता येईल, अशी त्यांची रचना आहे. काही भांड्यांना काल्पनिक प्राण्यांचा आकार दिला आहे. मुलांना ती खेळणीच वाटावीत, असा त्यामागील हेतू असावा. थडग्यांचे उत्खनन केल्यानंतर त्यातील बालकांचे जे अवशेष आढळले, त्यावरून त्यांचे वय एक ते दोन वर्षे किंवा दोन ते सहा वर्षे असावे, असे दिसते.मातीपासून बनवलेली ही छोटीशी खाद्य भांडी प्रथम युरोपमध्ये नवपाषाणयुगात इ.स.पू. ५,०००च्या सुमारास आढळली. त्यानंतरच्या कांस्य व लोह युगात अधिक प्रचलित झाली. तथापि, ही भांडी केवळ लहान मुलांसाठी तयार केली गेली आहेत किंवा कसे हे स्पष्ट झाले नाही. आजारी लोक किंवा वृद्धांना खायला देण्यासाठी त्यांचा वापर केला असण्याची शक्यता आहे.ताज्या निष्कर्षांमध्ये असे दिसून आले आहे की, बालकांच्या दफनस्थानामध्ये सापडलेल्या तीन पात्रांमध्ये जनावरांचे दूध भरले होते. भांड्यांच्या तळाशी शिल्लक असलेल्या पदार्थांचे रासायनिक विश्लेषण केले असता, हे दूध गाय, शेळी किंवा मेंढरांपासून काढले असावे, असे आढळले.बालकांना बाटलीने आहार देण्याची पद्धत आधुनिक नाही. काचेचा किंवा प्लॅस्टिकचा शोध लागण्यापूर्वी अगदी प्रागैतिहासिक संस्कृतीतील बाळांनाही छोट्या मातीच्या भांड्यांमध्ये जनावरांचे दूध दिले जात असे. एका संशोधनपर अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय