भारतात गेल्या महिनाभरापासून मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रात भूकंप आणलेल्या मीटू या मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झाले. 10 ऑक्टोबर 2017 ला #MeToo या शब्दप्रयोगाचा अर्थ लैंगिक अत्याचाराचा बळी असा असल्याचे पहिल्यांदाच समजले आणि ग्लॅमरस दुनियेमध्ये एकच वादळ निर्माण झाले. यामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त व्यक्तींवर आरोप करण्यात आले मात्र त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला शिक्षा झाली आहे. अमेरिकेचे टीव्ही कलाकार बिल कॉस्बी याला 10 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तरीही #MeToo या मोहिमेला ग्लॅमरच्या दुनियेमध्ये एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.
अमेरिकेमधील अभिनेत्रींसोबत आज जगभरातील 85 देशांमधील महिला या मोहिमेद्वारे सोशल मिडीयावर #MeToo या टॅगद्वारे आवाज उठवत आहेत. या देशांमध्ये आता भारतही सहभागी झाला आहे.
10 ऑक्टोबर, 2017 ला पहिल्यांदा न्यूयॉर्क टाइम्सने एक मोठा गौप्यस्फोट करणारी मुलाखत प्रसिद्ध केली. यामध्ये हॉलिवूडचा प्रोड्यूसर हार्वे वाइंस्टीन याच्यावर तब्बल 13 महिलांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. मात्र, हार्वे वाइंस्टीन याने या महिल्यांच्या मर्जीनेच शरीर संबंध ठेवल्याचा दावा केला होता.
भारतात लैंगिक शोषण मोठा मुद्दा; पण लैंगिक समानता नाहीभारतात महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार मोठा मुद्दा मानले जाते. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कडक कायदेही केले आहेत. मात्र, सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांमध्येही महिला अत्याचाराच्या बळी पडत आहेत. तसेच लैंगिक समानतेलाही थारा नाही. यामुळे 20 टक्के महिलांनाच त्यांच्यावरील ओढवलेल्या प्रसंगाबाबत बोलण्याची संधी मिळते.