मेक्सिकोमध्ये नेव्हीच्या एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टर उडता उडता खाली येऊन आधी एका व्हॅनवर आदळत आणि नंतर एका कारवर पडतं. त्यानंतर हेलिकॉप्टरच्या अनेक पार्ट्सचे तुकडे होतात. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक धावत जाऊन नेमकं काय झालं हे बघतात.
हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात हेलिकॉप्टर आकाशात कमी उंचीवर गिरक्या घेताना दिसत आहे. गिरक्या घेता घेता ते एका चालत येणाऱ्या व्हॅनवर पडतं. सुदैवाने व्हॅन सुखरूप बाहेर पडते.
सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या अपघातात मेक्सिको सेनेचा एक जवान जखमी झाला आहे.ही घटना लॅटिन अमेरिकन देश मेक्सिकोच्या हिडाल्गो राज्यात घडली. व्हिडीओत बघू शकता की, हेलिकॉप्टर कशाप्रकारे गिरक्या घेत खाली येऊन पडलं.
मीडिया रिपोर्टनुसार, मेक्सिकोच्या नेव्हीचं हे हेलिकॉप्टर वादळाने प्रभावित झालेल्या काही भागात मदत पोहोचवण्याचा काम करत होतं. तेव्हाच काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. जखमी जवानाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. असं सांगितलं जात आहे की, हे हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं.