मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाºयाजवळ ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला असून, विविध ठिकाणी इमारती आणि घरे कोसळल्याने ३२ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले . भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.दक्षिण मेक्सिकोतील टोनाला शहरापासून १०० किमीवर समुद्रात भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाची तीव्रता एवढी होती काही अनेक ठिकाणी जमीन दुभंगली. त्सुनामीच्या शक्यतेमुळे मेक्सिको व अमेरिकेत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या भूकंपाचे धक्के ग्वाटेमाला, एल सल्वाडोर, कोर्टारिका, निकारागुआ, पनामा, होन्डुरास व इक्वाडोरमध्येही जाणवले.मेक्सिकोमध्ये हा १९८५ नंतरचा सर्वात मोठा भूकंप असून, १९८५ साली भूकंपामुळे अनेक इमारती पडल्या होत्या आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी भूकंपाचा धक्का जाणवताच, लोक घरांतून बाहेर पडून रस्त्यांवर आले. अनेक भागांचा वीजपुरवठाही बंद झाला आहे. (वृत्तसंस्था)
मेक्सिकोत भूकंप; ३२ ठार, त्सुनामीची शक्यता : अॅलर्ट जारी, अनेक घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:53 AM