मेक्सिको: महापौराला गाडीला बांधून फरफटवल्याप्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक केली आहे. रस्ते खराब असल्यानं ग्रामस्थांनी महापौरांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढून एका पिकअप ट्रकला बांधलं आणि रस्त्यावरुन फरफटत नेलं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत महापौराची सुटका केली. मेक्सिकोमध्ये हा प्रकार घडला.महापौर जॉर्ज लुईस इस्कॅन्डॉन हेर्नानडेझ यांनी ग्रामस्थांना रस्ते दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र वारंवार वचनाची आठवण करुन देऊनही त्यांनी रस्ते दुरुस्त केले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी हेर्नानडेझ यांना कार्यालयातून बाहेर काढलं. यानंतर त्यांना पिकअप ट्रकला बांधून फरफटवण्यात आलं. या घटनेनंतर परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. याआधीही आश्वासनं पूर्ण न केल्यानं हेर्नानडेझ यांच्यावर शेतकऱ्यांनी हल्ला केला होता.
VIDEO: खराब रस्त्यानं नागरिक त्रस्त; महापौराला गाडीला बांधून फरफटवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 10:59 AM